नाशिक : जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. 28) उमटला.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि स्वामी समर्थ कृषी विकास आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ह्यकृषीमाल प्रक्रिया उद्योग व जोड व्यवसायातील संधीह्ण या चर्चासत्रात मुळशी येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके व टेक्नॉलॉजी सायन्स फॉर सोसायटी संस्थेच्या डॉ. शीतल सोमाणी यांनी सहभागी होत शेतकरी व कृषी शाखेच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंद्याचा मार्ग स्वीकारला त्यांनी आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांनीही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि आपली भौगोलिक परिस्थिती विकसित होऊ शकणारा व्यवसाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर शेती आणि शेतकरी टिकून राहण्यासाठी व शेती क्षेत्रचा उत्कर्ष साधण्यासाठी कृषीमाल प्रक्रिया उद्योग आणि जोडधंदे या दोन्हींची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत डॉ. शीतल सोमाणी यांनी व्यक्त केले. दरम्यान, शुक्रवारपासून कृषी महोत्सवांतर्गत वसविण्यात आलेल्या बाराबलुतेदार गावास व कृषी प्रदर्शनास मोठय़ा संख्येने शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. शनिवारी वीकेण्डमुळे भेट देणाऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडल्याचे दिसून आले.
भारुडांनी जिंकली मनेकृषी महोत्सवात शनिवारी सायंकाळच्या सत्रत कृषीविषयक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत मनोरंजनासोबत प्रबोधनही केले. चंदाबाई तिवाडी यांच्या भारुडांनी सर्वाची मने जिंकली. यावेळी त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठ येथील सेवामार्गाचे केंद्र प्रमुख व कार्यरत सेवेकऱ्यांची मासिक प्रशासकीय बैठक संपल्यानंतर सर्व सेवेकरी कृषी महोत्सवात सहभागी झाल्याने कृषी प्रदर्शनाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.रविवारी समारोपडोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवारपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.29) युवा महोत्सव व सरपंच मांदियाळीने समारोप होणार आहे. यावेळी चंद्रपूरचे चंदू पाटील मारकवार, यशदाचे शरद बुरटे पाटील, हिवरे बाजारचे पोपटराव पवार उपस्थित सरपंच व शेतक:यांना मार्गदर्शन करणार आहेत.