नाशिकरोड : उद्योग व शैक्षणिक संस्थांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभाप्रसंगी बोलताना वायुनंदन म्हणाले की, शैक्षणिक अर्हतेसोबत उद्योग क्षेत्रास लागणारे विविध कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता शैक्षणिक संस्थांनी उद्योग जगताशी समन्वय ठेवावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योग क्षेत्रास बळकट करण्याकरिता नवीन तंत्रज्ञान भारतातच विकसित व्हावे याकरिता लागणारे कुशल तंत्रज्ञ हे शैक्षणिक संस्थांनी उपलब्ध करून देण्याकरिता अभ्यासक्रमामध्ये काळानुरूप बदल करावेत, असे आवाहन केले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य ज्ञानदेव नाठे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अशोक कटारिया, संतोष मुथा, सुरेश वाघ, किशोर पाटील, प्रा. एफ. ए. खान आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे परीक्षा नियंत्रक प्रा. गिरीश वानखेडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन ठाकरे, प्रा. दीपाली किर्तने व आभार प्रा. प्रमोद कोचुरे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.सुवर्ण पदक प्रदानपाहुण्यांच्या हस्ते प्रथम सत्राच्या ४८८ व व्दितीय सत्राच्या १५३ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. तसेच संस्थेत शिकविल्या जाणाऱ्या १० अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रथम व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला.
उद्योग, शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:01 AM
उद्योग व शैक्षणिक संस्थांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.
ठळक मुद्देई. वायुनंदन : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभ