नाशिक :जिल्हा कुपोषणमुक्त करणे हे प्रथम कर्तव्य असल्याने ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून ग्राम बालविकास केंद्रामार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. मालेगाव येथील कुपोषण कामाचा आढावा गिते यांनी घेतला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.मालेगाव येथे आयोजित आढावा बैठकीत कुपोषणाचा आढावा घेताना डॉ. गिते म्हणाले, ग्रामीण विकास म्हणजे केवळ भौतिक सुविधांची निर्मिती करणे नसून मानवी विकास आणि मानवाचा विकास करणे आहे. मानवी विकास करण्यासाठी कुपोषण निर्मूलन करणे अत्यावश्यक आहे. नाशिक जिल्ह्णातच कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जात असून, सर्व विभागांच्या समन्वयाने याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्राम बालविकास केंद्रामार्फत प्रभावीपणे काम करून नाशिक जिल्हा निश्चितच कुपोषणमुक्त करू, असे प्रतिपादन डॉ. गिते यांनी केले.कुपोषण हा जिल्हा परिषदेचा सर्वाधिक अग्रक्र माचा विषय आहे. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम कारणे आवश्यक आहे. जिल्ह्णात १ जूनपासून यासाठी ग्राम बालविकास केंद्रांची स्थापन करण्यात येत असून, यासाठी ग्रामविकास आराखड्यातील निधी अंगणवाड्यांना देण्यात येणार आहे. या केंद्रात आरोग्य व आहारसंहितेनुसार आहार व औषधे देऊन अंमलबजावणी करावयाची आहे. याबाबत जिल्हा व तालुकास्तरावर सर्व संबंधित यंत्रणेला याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.शेवगा लागवडीचे आवाहनकुपोषण निर्मूलनासाठी शेवगा लागवड करण्याचे तसेच अंगणवाडी व घरात बाळकोपरा हा उपक्र म राबविण्याचे आवाहन डॉ. गिते यांनी केले. यावेळी शेवग्याच्या झाडांच्या बियांचे वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका यांचा आढावा घेताना बालकांची उंची मोजण्याच्या प्रक्रि येबाबत समाधान न झाल्याने स्वत: डॉ. गिते यांनी उंची कशी मोजावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी समन्वयाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:49 AM
नाशिक :जिल्हा कुपोषणमुक्त करणे हे प्रथम कर्तव्य असल्याने ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून ग्राम बालविकास केंद्रामार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. मालेगाव येथील कुपोषण कामाचा आढावा गिते यांनी घेतला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देनरेश गिते : मालेगाव येथे कुपोषण कामाचा आढावा