नाशिक : आजच्या आधुनिक जगात ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी राहिली नसून त्याचा मुक्तहस्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्रसाराच्या माध्यमातून समाजविकास व मानवी जीवनाचा उत्कर्ष साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी केले. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या संयुक्त पदवीग्रहण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. प्रारंभी मिरवणुकीने कार्यक्र माची सुरु वात झाली. पदवीग्रहण समारंभात संस्थेच्या शिक्षण व संशोधन महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान आाणि संगणक विज्ञान महाविद्यालय. चांदोरीचे कला, वाणिज्य व विज्ञान आणि संगणक विज्ञान, काकासाहेबनगर, भाऊसाहेबनगर (पिंपळस रामाचे), शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ललितकला महाविद्यालय, परफॉर्मिंग आर्ट्स महाविद्यालय या आठ महाविद्यालयांच्या १०६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. साने, डॉ. व्ही. एम. सेवलीकर, डॉ. बी. व्ही. किर्डले, डॉ. संतोष वाघ, बी. एन. वाघ, व्ही. एस. शिरसाठ, सचिन जाधव, मकरंद हिंगणे आदि उपस्थित होते. कार्यक्र माची सांगता परतीच्या मिरवणुकीने झाली प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता विसपुते यांनी केले. डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ज्ञानप्रसारातून समाजविकासासोबत जीवन उत्कर्ष साधण्याची गरज
By admin | Published: January 22, 2017 12:21 AM