सिन्नर : दिव्यांग महोत्सवातून विविध कला सादर केल्याने कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी लोककला महोत्सव काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केले.लोककलावंत अंबादास भालेराव यांच्या सहकार्याने सिन्नर सार्वजनिक वाचनालयात दिव्यांग लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भगत बोलत होते. माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर राजेश कापूर, नरेंद्र वैद्य, दिनेश चोथवे, मनीष गुजराथी, नगरसेवक रुपेश मुठे, मंगला शिंदे, सुजाता तेलंग, ज्योती वामने आदी उपस्थित होते.दिव्यांग लोककला महोत्सवात शहर व तालुक्यातील दिव्यांगांनी नृत्य, गायन, कथा, कविता सादर करून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. महोत्सवास सहभागी झालेल्या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी अश्विनी देशमुख, मंगल शिंदे, गणपत नाठे, केशव बिडवे आदींनी मनोगत व्यक्त केले. अंबादास भालेराव यांनी प्रास्ताविक तर नरेंद्र वैद्य यांनी आभार मानले. याप्रसंगी पी. एल. देशपांडे, प्रकाश घुगे, आनंदा सातभाई, राजेंद्र खर्डे, दत्त गरगटे, छबूबाई जाधव, भगवान पगर, मयूरी खर्डे, सूरज गोसावी, संजय नवसे आदी उपस्थित होते.
दिव्यांगांना प्रवाहात आणण्यासाठी लोककला महोत्सव काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 6:38 PM
सिन्नर : दिव्यांग महोत्सवातून विविध कला सादर केल्याने कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी लोककला महोत्सव काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केले.
ठळक मुद्देकृष्णाजी भगत : दिव्यांग लोककला महोत्सव उत्साहात