शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:56 IST

मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मोबाइल आणि भरजरी कपडे या गोष्टींना महत्त्व आल्याने आंतरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे, असे प्रतिपादन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देआचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज : जैन साधू-संतांच्या आगमनानिमित्त मिरवणूक

नाशिक : मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मोबाइल आणि भरजरी कपडे या गोष्टींना महत्त्व आल्याने आंतरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे, असे प्रतिपादन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. रविवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजता पुण्यप्रकाश, राका कॉलनी, शरणपूररोड येथे ‘सफलता के सही मायने’ या विषयावर महाराज बोलत होते.दरम्यान, जैन साधू-संतांच्या आगमनानिमित्त शहरातील कॉलेजरोड येथून कॅनडा कॉर्नरमार्गे शरणपूररोडवरील राका कॉलनीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.आचार्य रत्नसुंदर सुरी यांचे ‘सफलता के सही मायने’ या विषयावर सुमारे दीड तासाचे प्रवचन झाले. यावेळी महाराज म्हणाले की, जीवनात काही पाहिजे हे बरोबर आहे, पण फळाची अपेक्षा करू नका, संसारात तुम्ही राहता पण जीवनात आनंदी ठेवणारी एकतरी गोष्ट शाश्वत आहे काय? पूर्वीच्या काळात स्वत:चे वजन होते ते आता कागदावर आले, असे सांगून महाराज म्हणाले की, आज तुम्ही सुखी आहात का? जीवनात प्राप्ती आणि त्यानंतर तृप्ती या दोन्हींपैकी कशात सुख आहे हे आपण सांगावे पवित्रता, सुख, सफलता, विजय, सिद्धी हे जीवनाचे अंग आहेत, त्यामुळे याचा उपयोग निश्चितपणे करणे गरजेचे आहे. जीवनात काय मिळविले आणि माझ्याकडून काय गेलं याचा विचारदेखील आपण केला पाहिजे. राजन पारीख यांनी स्वागत केले.यावेळी राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, महेश शहा, गौतम सुराणा, डॉ. शैलेश शहा, सुंदर शहा, सुनील शहा यांच्यासह हजारो जैन बांधव उपस्थित होते. उद्या सोमवारी (दि. १३) सकाळी ९.१५ वाजता ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ विषयावर प्रवचन होणार आहे.आचार्य रत्नसुंदर सुरींच्या प्रवचनातील बोलमला दीक्षा घेण्यास ५३ वर्ष झाली असून आजही आनंदी आहे.४आपण दर रविवारी मनोरंजन करताना कधी पांजरापोळ, गोशाळा, हॉस्पिटलला भेट दिली का? एखाद्या गरिबाला उपयोगी पडण्याची इच्छा झाली काय?४ब्रॅँडेड कपडे पाहिजे म्हणतो पण आपण ब्रॅँडेड आहात का? असे महाराज यावेळी म्हणाले.मिरवणुकीचे स्वागतआचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज, आचार्य पद्मसुंदर सुरीजी महाराज आणि जैन साधू-संत यांच्या नाशिक शहरातील आगमनानिमित्त सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. कॉलेज रोडवरील शेखरभाई सराफ यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत महिलांच्या डोक्यावर कलश होते. तसेच यानिमित्त रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत वाद्य पथक, नृत्य पथक, सफेद वस्त्र परिधान केलेले नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक कॅनडा कॉर्नर, शरणपूर मार्गे राका कॉलनी येथे आली.

टॅग्स :NashikनाशिकJain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम