महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त येवल्यातील डॉ. दीपक ठोंबरे यांचे 'महिलांचे आरोग्य व महिला सबलीकरण' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
यावेळी डॉ. ठोंबरे यांनी, चांगल्या आरोग्याची वाट चांगल्या आहारातून जाते, असे सांगून मुलींनी व महिलांनी घ्यावयाच्या सकस आहारविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. मनीषा गायकवाड व प्रा. शारदा अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबतच स्वच्छता कर्मचारी महिलांना साडीचोळी देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक संयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ वाकळे यांनी केले तर, अतिथींचा परिचय डॉ. धनराज धनगर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. कैलास बच्छाव यांनी केले तर आभार प्रा. डी. के. कन्नोर यांनी मानले.
कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, डॉ. सौ. कोमल ठोंबरे, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. शांताराम पानपाटील, प्रा. शरद चव्हाण, प्रा. विलास खैरनार आदी उपस्थित होते.
फोटो - ०८ येवला ठोंबरे
येवला येथील महाविद्यालयात बोलताना डॉ. दीपक ठोंबरे. समवेत डॉ. सौ. कोमल ठोंबरे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, डॉ. मनीषा गायकवाड, प्रा. शारदा अहिरे आदि.
===Photopath===
080321\08nsk_41_08032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०८ येवला ठोंबरे येवला येथील महाविद्यालयात बोलताना डॉ. दिपक ठोंबरे. समवेत डॉ. सौ. कोमल ठोंबरे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, डॉ. मनीषा गायकवाड, प्रा. शारदा अहिरे आदि.