नाशिक : मानसिक स्वास्थ्य ही समाजाची गरज तर आहेच, पण आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची ही गरज आहे. विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार गेल्या तीन वर्षांत वैद्यकीय आणि संलग्न शाखांमध्ये प्रवेश घेणाºया एक पंचमांश विद्यार्थ्यांना मानसिक समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्याची गरज असून, त्यासाठी उपाययोजना करण्याबाबत तज्ज्ञांनी सूचना कळविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना तसेच नव्याने उद््भवणाºया मोबाइलचा अतिवापर याबद्दलही संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.इंडियन सायकियॅट्रिक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेच्या २९ व्या दोन दिवसीय वैद्यकीय प्रशिक्षण परिषदेचे शनिवारी (दि.२७) यंदा नाशिकमध्ये उद््घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि इंडियन सायकियॅट्रिक सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मृगेश वैष्णव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संयोजन समिती अध्यक्ष डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. राजेश धुमे, डॉ. दीपक राठोड, डॉ. आशिष श्रीवास्तव, डॉ. हेनल शाह आदी उपस्थित होते.डॉ. मुकेश जग्गीवाला आणि डॉ. हेनल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे आणि नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. एस. व्ही. प्रसाद यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. महेश भिरुड आणि डॉ. प्रिया राजहंस यांनी केले. डॉ. हेमंत सोननीस यांनी आभार मानले.वैद्यकीय प्रशिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. मृगेश वैष्णव यांनी मानसिक आजार व त्यांचे उपचार याचा समावेश विविध शासकीय योजनांमध्ये व्हावा तसेच विमा कंपन्यांनीही मानसिक आजारांना विमा संरक्षण द्यावे यासाठी इंडियन सायकियॅट्रिक सोसायटी कार्यरत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्याची गरज : दिलीप म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:29 AM