लोहोणेर : आपल्या गावचा विकास साधायचा असेल तर प्रथमत: गाव हगणदारीमुक्त करा. तसेच आप-आपसातील हेवेदावे विसरून गावाचा विकास साधा. शासनाच्या भरवशावर कितपत विकास साधणार. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे आहे, असे मत आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त विजेते भास्करराव पेरे पाटील यांनी देवळा तालुक्यातील लोहोणेर, खालप, वाखारी येथील ग्रामपंचाय सदस्यांना मार्गदर्शन करताना केले. लोहोणेर, खालप, वाखारी येथील ग्रामपंच्यायतींच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणुन दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पाटोदा या गावाला भेट देऊन येथील विकासकामाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली. यावेळी येथील गांव विकासाचे स्वप्न घेवून सतत जीवाचे रान करणारे पेरे पाटील यांनी या ग्रामपचयायतीच्या पदाधिकार्यांना पाटोदा ग्रांमपचायतीचे सरपंच कल्याण पेरेपाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले. यावेळी लोहोणेर, खालप, वाखारी येथील ग्रामपंच्यायतीच्या पदाधिकार्यानी पातोदा येथील विविध लोकउपयोगी विकास कामांची पाहणी केली यावेळी लोहोणेर ग्रामपंचयतीच्या सरपंच जयवन्ता बच्छाव,उपसरपंच रेश्मा महाजन, सदयस दीपक बच्छाव, धनराज महाजन, निंबा धामणे, किशोर देशमुख,मधुकर बच्छाव, सौ. सुरेखा अिहरे, शशिकला बागुल, आशाबाई वाघ, हिरामन वाघ, विकास सोसायटी चेअरमन बाजीराव शेवाले , व्हा. चेअरमन अशोक नेरकर, अशोक अलई, ग्रामविकास अधिकारी यु. बी. खेरनार , पो.पा. अरु ण उशिरे , खालप येथील नानाजी सुर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, दगा सूर्यवंशी, कपिल सूर्यवंशी, बारकुअ सूर्यवंशी,दादाजी सोनवने बाळु सूर्यवंशी, अशोक पवार,सुरेश पवार तसेच वाखारी येथील डॉ.संजय शिरसाठ , नितिन ठाकरे , राहुल पवार, रवि जाधव, विलास पवार एकनाथ अिहरे ग्रामसेवक एन. पी. सूर्यवंशी आदी सह सबधित ग्रामपंचयतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थितहोते. (वार्ताहर)
विकासासाठी गाव हगणदारीमुक्त करण्याची गरज
By admin | Published: August 21, 2016 12:53 AM