नाशिक : मनुष्याने आपल्या जीवनात धर्माला हृदयात स्थान देण्याची गरज आहे़ मोहमयी संसारात गुंतून राहण्याऐवजी त्यातून बाहेर पडा, मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करा, असे प्रतिपादन प़ पू़ डॉ़ समकितमुनीजी म़सा़ यांनी केले़जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघाच्या वतीने रविवार कारंजा येथील जैनस्थानकात आयोजित चतुर्मास आराधना कार्यक्रमात चतुर्मास प्रवचनाच्या शुभारंभप्रसंगी मुनीजी बोलत होते़ यावेळी डॉ़ समकितमुनीजी यांनी प्रवचनात सांगितले की, मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्या मोहमयी संसारातील सुखाचा त्याग करावा लागेल़सम्यक पुरुषार्थ करणाऱ्याला सफलता प्राप्त होते़ चातुर्मास काळात मनुष्याने धर्मकार्य केल्यास दु:ख व चिंता दूर होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले़चतुर्मासातील तप, त्याग, दान आदींचे महत्त्वदेखील त्यांनी सांगितले़ चातुर्मासच्या प्रथम प्रवचनप्रसंगी पूज्य प्रमोद मुनीजी म़ सा़ यांनी उपस्थित राहून मंगलपाठ प्रदान केला़कार्यक्रमास संघपती राजमल भंडारी, उपसंघपती मंगलचंद साखला, महामंत्री सुभाष लोढा, प्रसिद्धी प्रमुख सुभाष भंडारी आदींसह पदाधिकारी तसेच श्रावक, श्राविका उपस्थित होते़दरम्यान, महामंत्री सुभाष लोढा यांनी सांगितले की, दररोज प्रचवनाची वेळ ही सकाळी ९ ते १० राहील़ तसेच मंगळवारी (दि़ १६) गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष प्रवचन होईल़
धर्माला आपल्या हृदयात स्थान देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:55 AM