येवला येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. पहिलवान प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना पक्के बिल घेतले पाहिजे. पक्के बिल घेतल्याने ग्राहकाला कर भरावा लागेल, तो विक्रेत्यालाही भरावा लागतो; परंतु ग्राहक म्हणून तुमची फसवणूक झाल्यास तुम्हाला हमखास न्याय मिळेल, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. वसंत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बी. एल. शेलार यांनी तर आभार प्रा. टी. एस. सांगळे यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे, डॉ. धनराज धनगर, प्रा. रघुनाथ वाकळे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो : १५ येवला ग्राहक दिन
येवला महाविद्यालयात आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. रमेश पहिलवान. समवेत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, प्रा. अरुण वनारसे आदि.
===Photopath===
150321\15nsk_33_15032021_13.jpg
===Caption===
येवला महाविद्यालयात आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. रमेश पहिलवान. समवेत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, प्रा. अरूण वनारसे आदि.