कोरोनानंतर आता पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत असल्याने यावर उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी (दि. १४) शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुसे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता, मात्र आता जिल्ह्यात पोस्ट कोविडनंतर म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना अधिक धोका संभवत असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत असल्यामुळे शहरातील बालरुग्णालयातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. बालरुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची संख्या वाढविण्यात यावी. भविष्यातील संभाव्य धोके ओळखून शासनासह महानगरपालिका व खासगी रुग्णालयांनी आपसात समन्वय ठेवून या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही भुसे यांनी सांगितले.
इन्फो
खासगी डॉक्टरांना आवाहन
आरोग्य प्रशासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा गरजेच्या असल्याचे सांगताना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, सर्व खासगी डॉक्टरांनी सामाजिक दायित्वातून रुग्णसेवेत योगदान दिल्यास पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस या आजारावर मात करण्यास वेळ लागणार नाही. त्याच बरोबर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी मधुमेही रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.