नाशिक : रक्तदानाविषयी शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची गरज असून, रक्तदानाच्या क्षेत्रात व्यापक स्वरूपात काम होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी केले. अर्पण रक्तपेढीच्या द्विदशकपूर्ती सोहळ्यात डॉ. मो. स. गोसावी, मुंबईतील ज्येष्ठ उद्योजक एस. एम. शाह, उद्योजक नरेंद्रभाई शाह, अर्पण रक्तपेढीचे माजी कार्यकारी संचालक बी. के. कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक राधाकिसन चांडक यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक राधाकिसन चांडक यांच्या वतीने उद्योजक अतुल चांडक यांनी अर्पण थॅलेसेमिया सोसायटीस दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अर्पण रक्तपेढीचे सेक्रेटरी डॉ. अतुल जैन यांनी, तर सूत्रसंचालन कार्यकारी संचालक वर्षा उगावकर यांनी केले. व्यासपीठावर अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉ. एन. के. तातेड, डॉ. राजेश सावंत, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. रत्नाकर कासोदकर, अनिल आडेवार आदि उपस्थित होते.
रक्तदानासाठी जनजागृतीची गरज
By admin | Published: January 17, 2017 12:37 AM