नाशिक : सोमवारपासून (दि. २५) या अधिवेशनाला प्रारंभ झाला असून, बुधवारपर्यंत ते चालणार आहे. थिटे पुढे म्हणाले की, संस्कृतचे प्रदूषण ही गंभीर बाब असून, दुर्दैवाने लोकांना या गोष्टीची जाणीव होत नाही. अशा प्रकारचे साहित्य लिहिणाºयांचा, ते संपादित करून प्रकाशित करणाºयांचा पारितोषिके देऊन सत्कारही केला जात आहे आणि ही बाब कुणाला खटकत नाही याचेही आश्चर्य वाटते. प्राच्यविद्यांनाही प्रगत संगणक आणि इतर आधुनिक तंत्राच्या हातात हात घालत चालत असल्याचा आनंद आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. मल्हार कुलकर्णी यांनी व्यक्त केला. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी डॉ. भांडारकर यांचे प्राच्यविद्या अभ्यासातील योगदान, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासातील त्यांचे योगदान आदींविषयी आपल्या मनोगतातून माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या सारांश पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राच्यविद्या परिषदेचे सहसचिव डॉ. श्रीनंद बापट, प्रा. डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेद आणि अस्वेता, व्याकरण व भाषाशास्त्र, अभिजात साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान, प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, नाशिक : इतिहास आणि संस्कृती अशा विषयांवर देशभरातील प्रतिनिधींनी सादरीकरण केले. त्यात डॉ. दिलावरखान पठाण, डॉ. अमृता नातू, डॉ. तेजस गर्गे, डॉ. साहेबराव निगळ, डॉ. अंजली परब, डॉ. प्रसाद जोशी आदींचा समावेश होता. यावेळी कुर्तकोटी शंकराचार्य न्यासातर्फे यावर्षीपासून संस्कृत विषयात महाविद्यालयात प्रथम येणाºया विद्यार्थ्यास पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. राजाभाऊ मोगल, प्रमोद भार्गवे आदी उपस्थित होते. नूपुर सावजी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. लीना हुन्नरगीकर यांनी आभार मानले.
संस्कृत भाषेची भेसळ थांबविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:48 AM