कळवण : मातृभाषा मराठीवर परभाषांचे आक्र मण वाढले असून ते रोखण्याची गरज असल्याची भावना डॉ. उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली. कळवण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयातील कला, सांस्कृतिक आणि वाड्मय मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफतांना डॉ. शिंदे बोलत होत्या. मराठी भाषेत इंग्रजी, हिंदी, फारशी, अरबी, पोतुर्गीज आणि फ्रेंच या भाषांचे अतिक्र मण झाले असून मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे. वेळीच पाऊले ओळखून यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले. लोकसाहित्य हा आपल्या मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.उपप्राचार्य डॉ. एन. के. आहेर अध्यक्षस्थानी होते. त्यांनी मराठी भाषा रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरली पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र कापडे यांनी प्रास्ताविक, प्रा. पंकज पवार यांनी संयोजन तर आभारप्रदर्शन प्रा. योगेश गांगुर्डे यांनी केले.सदर कार्यक्र मास प्रा. संदीप पवार, प्रा. योगेंद्र ठाकरे, प्रा. शिरसाठ, प्रा. आश्विनी आहेर, प्रा. हिरे, प्रा. कोठावदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी भाषेवरील आक्र मण रोखण्याची गरज : उषा शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:20 PM
कळवण : मातृभाषा मराठीवर परभाषांचे आक्र मण वाढले असून ते रोखण्याची गरज असल्याची भावना डॉ. उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली. कळवण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयातील कला, सांस्कृतिक आणि वाड्मय मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे मराठी भाषा रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरली पाहिजे असे मत व्यक्त केले.