नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ राफेल खरेदी घोटाळ्याबाबत पंतप्रधान मोदी संसदेत कोणताही स्वरूपाचा खुलासा करीत नाहीत़ त्यामुळे या हुकूमशाही सरकारला जाब विचारण्याची तसेच सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़ केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफे ल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल - डिझेलचे वाढलेले भाव, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात मंगळवारी (दि़११) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते़ महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले़यावेळी मोर्चेकऱ्यांनी भाजपा सरकार विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
केंद्रातील मोदी सरकारला रोखण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:20 AM
फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ राफेल खरेदी घोटाळ्याबाबत पंतप्रधान मोदी संसदेत कोणताही स्वरूपाचा खुलासा करीत नाहीत़ त्यामुळे या हुकूमशाही सरकारला जाब विचारण्याची तसेच सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़
ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण : जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा