शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

मोदी सरकारला रोखण्याची गरज: चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 6:50 PM

नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देराफेल विमान खरेदी भ्रष्टाचारचौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफे ल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल - डिझेलचे वाढलेले भाव, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि़११) शहरातून मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते, राफेल विमान खरेदी भ्रष्टाचाराबाबत बोलतांना ते म्हणाले की, संरक्षणात महत्वाची भूमिका असलेल्या हवाई दलासाठी उच्च प्रतिची विमाने खरेदीचा मुद्दा २००० मध्ये चर्चेत आला़ यावर युपीए सरकारने विविध देशांकडून निविदा मागवून ६३० ते ६५० कोटी रुपये किमतीची १२६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला़ यापैकी १८ विमाने ही फ्रान्सकडून तर १०८ विमाने ही एचएएचल कंपनीत तयार केली जाणार होती़

पंतप्रधान मोदी हे २०१५ मध्ये फ्रान्सच्या दौ-यावर गेल्यानंतर त्यांनी हा करार रद्द केला व १६६० कोटी रुपये किमतीची ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला़ यातील प्रत्येक विमानासाठी १०५० ते १०६० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले असून यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे़ याबरोबरच विमाननिर्मितीचे ३० हजार कोटी रुपयांचे काम एचएएल या अनुभवी कंपनीऐवजी काही दिवसांपुर्वीच तयार झालेल्या रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ या विमान खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान संसदेत उत्तरे देत नाही़ त्या घोटाळ्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहोचावी, यातील दोषींची चौकशी व्हावी यासाठी कॉग्रेसतर्फे मोर्चा काढून जनजागृती केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़

महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने व पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले़ यावेळी मोर्चेक-यांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, कल्पना पांडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे, वत्सला खैरे, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस