ााशिक : प्राच्यविद्येत पाली, संस्कृत, मराठी, इतिहास अशा अनेक उपविद्या आहेत. पैकी संस्कृत भाषेचे सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश थिटे यांनी केले. ते एचपीटी महाविद्यालयात आयोजित बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सोमवारपासून (दि. २५) या अधिवेशनाला प्रारंभ झाला असून, बुधवारपर्यंत ते चालणार आहे. थिटे पुढे म्हणाले की, संस्कृतचे प्रदूषण ही गंभीर बाब असून, दुर्दैवाने लोकांना या गोष्टीची जाणीव होत नाही. अशा प्रकारचे साहित्य लिहिणाºयांचा, ते संपादित करून प्रकाशित करणाºयांचा पारितोषिके देऊन सत्कारही केला जात आहे आणि ही बाब कुणाला खटकत नाही याचेही आश्चर्य वाटते. हल्ली संस्कृत भाषेत ‘देवभक्ती, देशभक्ती आणि देहभक्ती’ अशा तीन विषयांवर काव्याचे उदंड पीक येत आहे. त्याचा दर्जा तपासला जात नसून संस्कृतच्या काही अभ्यासकांची ही भाटगिरी भविष्यास मारक असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्राच्यविद्यांनाही प्रगत संगणक आणि इतर आधुनिक तंत्राच्या हातात हात घालत चालत असल्याचा आनंद आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. मल्हार कुलकर्णी यांनी व्यक्त केला. जुने आणि नवे दोन्हीही ज्ञान एकमेकांसोबत प्रवास करत असून, यातून मोठे संशोधन उदयाला येत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी डॉ. भांडारकर यांचे प्राच्यविद्या अभ्यासातील योगदान, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासातील त्यांचे योगदान आदींविषयी आपल्या मनोगतातून माहिती दिली. कुठल्याही विद्याशाखेचा अभ्यास करताना त्यात सर्वोच्च स्थान मिळविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या सारांश पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
संस्कृत भाषेचे प्रदूषण थांबविण्याची गरज : थिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 5:19 PM
ााशिक : प्राच्यविद्येत पाली, संस्कृत, मराठी, इतिहास अशा अनेक उपविद्या आहेत. पैकी संस्कृत भाषेचे सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश थिटे यांनी केले. ते एचपीटी महाविद्यालयात आयोजित बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सोमवारपासून (दि. २५) या अधिवेशनाला प्रारंभ झाला ...
ठळक मुद्दे हल्ली संस्कृत भाषेत ‘देवभक्ती, देशभक्ती आणि देहभक्ती’ अशा तीन विषयांवर काव्याचे उदंड पीकसंस्कृतच्या काही अभ्यासकांची भाटगिरी भविष्यास मारक