नाशिकरोड : भारतात राष्टÑधर्माचे प्रणेते अनेकजण होऊन गेले. भारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष जगाला दिला. त्यांनी घालून दिलेली तत्त्वे अंगीकारण्याची गरज आहे. आपले काम प्रत्येकाने वेळेत व जबाबदारीने केल्यास कुठलीही अडचण येत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध बारकावे, पैलू यांचा अभ्यास या परिषदेतून सर्व विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांना निश्चितच होईल, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.नाशिकरोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशा’ या विषयावरील आंतरराष्टÑीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मो. स. गोसावी बोलत होते. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी डॉ. प्रकाश पाठक यांनी डॉ. आंबेडकर यांनी मांडलेले विचार व केलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक कायदा क्षेत्रातील योगदान २१ व्या शतकातही अभ्यासपूर्ण व महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. डॉ. विजया खरे, डॉ. डेव्हील ब्लंडेल, व्हॅँग ह्यू-जी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील एकूण ८८ लेख समाविष्ट असलेले युजीसी मान्यताप्राप्त जनरल व ई-सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. इंदिराताई आठवले यांनी परिषदेविषयी माहिती देताना विविध तांत्रिक सत्रांचा तपशील सांगत देश-विदेशातून चांगला प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. परिषदेचे संचालक प्राचार्य राम कुलकर्णी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, परिषदेचे संचालक व विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, कॅलिफोर्निया येथील डॉ. डेव्हिड ब्लंडेल, फ्लोरिडा येथील फ्रॅँक टेडीस्को, हंगेरी येथील डॉ. डरडॅक टिबोर, कॅलिफोर्निया येथील व्हॅँग ह्यु-जी, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरराष्टÑीय केंद्राचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे, रांची विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पारस चौधरी, बिहार येथील डॉ. केदारनाथ, परिषदेच्या निमंत्रक डॉ. इंदिरा आठवले, आस्थापना संचालक शैलेश गोसावी आदी उपस्थित होते.
आंबेडकरांच्या तत्त्वांची जगाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:18 AM