शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रस्त्यातील झाडे तोडण्यापेक्षा पुनर्रोपणाची गरज : अश्विनी भट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:14 PM

नाशिक : शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देब्लॉक प्लॅँटेशन चांगलेचरस्त्याच्या कडेलाही वृक्षारोपणाची गरज

नाशिक: शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले. नाशिकमधील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या भट यांनी यापूर्वीदेखील मुंबई- आग्रा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी वृक्षतोडीस विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवादप्रश्न : शहरातील वृक्षतोडीला तुमचा विरोध का?भट : महापालिकेचे काम मुळातच हा पर्यावरण संवर्धनाचे असले पाहिजे. नाशिकचा समावेश प्रदूषणकारी शहरांच्या यादीत झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पर्यावरण राखले पाहिजे. रस्त्याच्या कडेला दर दहा मीटर अंतरावर स्थानिक प्रजातीची झाडे लावली पाहिजेत, असा नियम आहे. परंतु, तसे होत नाही. महापालिकेच्या वतीने झाडे तोडण्यात जेवढे स्वारस्य दाखविले जातो तेवढे झाडे तोडण्यात स्वारस्य दाखविले जात नाही. किमान झाडे तोडायची तर शास्त्रोक्त पद्धतीने काढून त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. धुळ्यात २१ जूनी झाडे पुनर्रोपणानंतर टिकली आहेत, मात्र नाशिकमध्येच ती का टिकत नाही याचा शोध घेतला पाहिजे.प्रश्न : महापालिकेच्या वतीनेदेखील वृक्षलागवड केली जाते, गेल्या वर्षी तर देवराई उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याविषयी काय सांगाल?भट : महापालिकेने गेल्या वर्षभरात चांगले वृक्षारोपण केले आहे. ब्लॉक प्लॅँटेशनदेखील केले आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, अशाप्रकारची झाडे लावणे बंधनकारकच आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पन्नास - शंभर वर्षांपूर्वीची झाडे तोडायची आणि त्या बदल्यात ब्लॉक प्लॅँटेशन करायचे याला कोणताही अर्थ नाही. रस्त्याच्या कडेलादेखील झाडे लावणे बंधनकारक असून, तेथे झाडे लावणे बंधनकारच आहे.प्रश्न : रस्त्यातील झाडे तोडण्यात गैर काय?भट : महापालिका रस्त्याच्या कडेला झाडे लावतच नसल्याचे लक्षात आल्याने यापूर्वीच न्यायालयाने देशी प्रजातीची झाडे हटवू नये, असे आदेश दिला आहे. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण होत नाही. रस्त्यालगतही रुंदीकरण करून डांबरीकरण करताना बुंधे मोकळे ठेवले जात नाही. त्यामुळे झाडे फार काळ टिकत नाही. रस्त्यातील झाडांमुळे अपघात होतात, त्यामुळे ती तोडावा अशी एक मागणी आहे. परंतु नीट तपास केला तर झाडांमुळे अपघातात बळी पडणाऱ्यांपेक्षा रस्ता अपघातात बळी जाणाºया पादचाºयांची संख्या अधिक आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होतो त्यांचे दु:ख मी समजू शकते. परंतु रस्त्यात येणाºया झाडावर फ्लोरोसंट कलरने पेंट करण्याचे साधे सौजन्य महापालिका दाखवत नाही, केवळ खिळ्याने रिफ्लेक्टर ठोकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे झाडांवर मोटर आदळून होणाºया अपघातांमध्ये झाडे नव्हे तर महापालिकेचा गलथान कारभार कारणीभूत आहे.मुलाखत-संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण