नाशिक : गत सहा महिन्यांत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमधून निगेटिव्ह चाचण्यांची संख्या तब्बल दोन लाखांच्या वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यात झालेल्या २ लाख ८१ हजार २१० चाचण्यांपैकी निगेटिव्हची संख्या २ लाख ४९ झाली होती.जिल्ह्यातील ६९ हजार १७१ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत ९ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी ८३६ रु ग्ण बाधित असल्याचे आढळले असून, ७६२रु ग्णांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या ९ हजार ५०८ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात ४ हजार ५२, ग्रामीणचे ४ हजार ९३२, मालेगाव ४११, तर जिल्ह्याबाहेरील १११ असे ९ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ८० हजार ११६ रु ग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या कमी झाली आहे. रविवारी दिवसभरात दहा जणांचा मृत्यू झाला. त्यात शहराचे ५, ग्रामीणचे ४, तर मालेगावच्या एकाचा समावेश आहे.
निगेटिव्ह चाचण्यांनी ओलांडला तब्बल दोन लाखांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 1:36 AM
गत सहा महिन्यांत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमधून निगेटिव्ह चाचण्यांची संख्या तब्बल दोन लाखांच्या वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यात झालेल्या २ लाख ८१ हजार २१० चाचण्यांपैकी निगेटिव्हची संख्या २ लाख ४९ झाली होती.
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे दहा बळी; ८३५ नवे रुग्ण