नाशिक : उन्हाळ्यात घरोघरी कुलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला असून, कुलर वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत महावितरणकडून प्रबोधन केले जात आहे. लोखंडी पत्र्याच्या कुलरमुळे वीजप्रवाह उतरून अपघाताचा धोका सर्वाधिक असल्याचे संबंधित अधिकाºयांनी खासगीत सांगितले. कुलरचा वापर करताना अनेकवेळा कुलरमध्ये विद्युतप्रवाह उतरून अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. निष्काळजीपणा, अतिआत्मविश्वास ही वीज अपघाताची मूळ कारणे असून, प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता आणि प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. शून्य वीज अपघात हे महावितरणचे उद्दिष्ट आहे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित असताना अनेक ग्राहक अशी खबरदारी घेत नाहीत. ओल्या हाताने कधीही कुलरला स्पर्श करू नये. हे फार धोकादायक आहे. कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच कुलरची तार पाण्यात पडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा सूचना ग्राहकांना करण्यात आल्या आहेत.दक्षतेचे आवाहनअपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाºया लहान मुलांचा समावेश सर्वाधिक असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत अशा पद्धतीने कुलरची मांडणी करावी. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
कुलरच्या वापराबाबत निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:17 AM