नाशिक महामॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद : गोल्फ क्लबवर रंगला बक्षीस वितरण सोहळा
नाशिक : लोकमत वृत्तपत्र समूह आणि दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रस्तुत नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील अर्धमॅरेथॉनमध्ये इथियोपिया देशाचा लोमलू मिकीयास इमाटा हा पुरुष गटात, तर जळगावची नेहा सोनवणे महिला गटात प्रथम विजेते ठरले. अत्यंत उत्साह आणि उत्कंठावर्धक झालेल्या या स्पर्धेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले होते.लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच मॅरेथॉनला देश-विदेशांतील धावपटूंसह नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी ६ वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी पहाटे ५ वाजेपासून गोल्फ क्लब मैदानावर एकत्र आलेल्या हजारो धावपटूंनी झुम्बा नृत्यावर वार्मअप केले. रंगीबेरंगी प्रकाशझोतांची किरणे आणि वाद्यांच्या गजरात उपस्थितांनी ठेका धरत वार्मअप केले. मैदानावर जमलेल्या प्रत्येकाच्या चेहºयावरील आनंद स्पर्धेची उत्सुकता दर्शविणारा होता. आपल्या चिमुकल्यांसह आलेले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि व्यावसायिकांचे ग्रुप तसेच वैयक्तिक आलेल्या प्रत्येक धावपटूने लोकमतच्या आयोजनाला दाद दिली.सकाळी ६ वाजता १० किलोमीटरमध्ये सहभागी धावपटूंना झेंडा दाखविण्यात आला. (पान २ वर)इथोपियाचा लोमलू, जळगावची नेहा विजेते त्यानंतर ६.१५ वाजता २१ कि.मी., तर ७ वाजता ३ आणि ५ किलोमीटरमध्ये सहभागी झालेले धावपटूंनी धाव घेतली.गोल्फ क्लब मैदान ते हॉटेल संस्कृतीपर्यंतच्या २१ किलोमीटरच्या अर्थमॅरेथॉनमध्ये इथोपिया देशाच्या लोमलू निकयास इमाटा या धावपटूने १:१२:०२ अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकाविला, तर पिंटो यादव यांनी १:१२:३३ आणि रमेश गवळी यांनी १:१२:४३ अशी वेळ नोंदवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.२१ किलोमीटर अर्धमॅरेथॉनच्या महिला गटातून नेहा सोनवणे यांनी २:१३:१७ अशी वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकाविला, तर डॉ. श्वेता भिडे २:१७:४७ सेकंदांची नोंद करीत दुसरा क्रमांक मिळविला, तर नीता नारंग यांनी २:२०:४४ सेकंदांची नोंद करीत तिसरा क्रमांक मिळविला.अर्थमॅरेथॉनमध्येच पुरुषांच्या ज्येष्ठ गटात कराड येथील कैलास माने यांनी, तर महिलांच्या गटात लिलम्मा अल्फोन्सो या मुंबई येथील महिलेने प्रथम क्रमांक मिळविला. याच ज्येष्ठ गटात लक्ष्मण यादव यांनी द्वितीय आणि घनश्याम वाघ यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये शीतल संघवी आणि जयश्री पटेल यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.गोल्फ क्लब ते महिंद्रा सर्कल या १० किलोमीटर मॅरेथॉनमध्ये पुरुष गटांत नाशिकचा अतुल चौधरी याने प्रथम क्रमांक मिळविला, तर महिला गटात उदगीर येथील पूजा श्रीडोळे प्रथम क्रमांकाने विजयी झाली, तर ज्येष्ठ गटात कोल्हापूरचे पांडुरंग पाटील आणि कल्याणच्या शोभा देसाई विजेत्या ठरल्या.२१ कि.मी. डिफेन्स पुरुष गटात : दशरथ पटले १:१६:२० वेळेची नोंद करीत प्रथम, श्याम उके यांनी १:२२:१५ अशी वेळ नोंदवत द्वितीय, तर करण कोकीटकर यांनी १:२२:५६ अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळविला, तर महिलांमध्ये निवृत्ता दहावाढ हिने १:५०:५६ मिनिटांची वेळ नोंदवून प्रथम, तर अंकिता मेनन हिने २:०२:३७ वेळ नोंदवून दुसरा क्रमांक मिळविला. तीन आणि पाच किलोमीटरच्या फन रनचाही हजारो नाशिककरांनी आनंद घेत ‘भागोे रे’ म्हणत एकच जल्लोष केला. अतिशय भव्य आणि उत्साही वातावरणात धावपटूंनी नाशिक महामॅरेथॉन यशस्वी केली.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी धावपटू, नाशिककर नागरिक, प्रायोजक तसेच मान्यवर आणि प्रमुख पाहूण्यांचे आभार व्यक्त करून या सर्वांच्या प्रयत्नाने महामॅरेथॉन यशस्वी होवू शकली, असे सांगितले. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा भेंडे यांनी केले.रुचिरा दर्डा यांनीमानले नाशिकचे आभार लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजिका रुचिरा दर्डा यांनी नाशिककरांच्या उत्साहाचे कौतुक करीत आभार मानले. धावपटूंमध्ये असलेल्या ऊर्जेने स्पर्धा यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिककरांचा जल्लोष पाहून पुढीलवर्षीदेखील नाशिकमध्ये महामॅरेथॉन स्पर्धा घेतली जाईल,असे त्यांनी जाहीर केले.