नाशिक : चांदवड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने थेट नेपाळमधील एका कांदा व्यापाऱ्याशी व्यवहार करत सुमारे साडे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नेपाळच्या व्यापाऱ्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे धाव घेत तक्रार दिली. दिघावकर यांनी पडताळणी करत तत्काळ ग्रामीण पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी त्या संशयित व्यापाऱ्याला हुडकून काढत त्याने नेपाळच्या व्यापाऱ्याची फसवणूक करत लांबविलेले साडेसहा लाखांची रक्कम परत केली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेपाळ येथील व्यापारी राजाराम मुक्तीनाथ रेग्मी यांना चांदवड येथील कांदा व्यापारी संशयित राहुल चौधरी याने ह्यस्वस्तात कांदा देतोह्ण असे सांगून राजाराम यांच्याकडून चौधरी याने सुमारे साडेसहा लाख रुपये ऑनलाइन स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतले; मात्र त्यानंतर चौधरी याने त्यांना कांदाही पाठविला नाही आणि बँक खात्यात राजाराम यांनी जमा केलेली रक्कमही पुन्हा परत केली नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याने, तसेच चौधरी याने दिलेले धनादेशही बँकेत वटले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, राजाराम यांना दिघावकर यांच्या मोहिमेबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी (दि.१६) त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची तत्काळ दखल घेत लासगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले.पोलिसांच्या तत्परतेमुळे वाढला महाराष्ट्राचा नावलौकिकपोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे यांच्या पथकाने तक्रार अर्जाची शहानिशा करीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला व त्यास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी ह्यखाक्याह्णदाखविताच व्यापारी चौधरी याने तातडीने राजाराम यांना त्यांच्याकडून घेतलेली सहा लाख ५० हजार रुपयांची रक्कम परत केली. पोलिसांनी घेतलेली कठोर भूमिका घेत दाखविलेल्या तत्परतेमुळे परदेशी व्यापाऱ्याची झालेली फसवणुकीची रक्कम पुन्हा त्याच्या पदरात पडली. यामुळे नक्कीच नेपाळस्थित राजाराम यांच्या मनात महाराष्ट्र पोलिसांविषयी चांगली प्रतिमा निर्माण झाली असेल.
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याचे बुडालेले साडेसहा लाख मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 9:14 PM
नाशिक : चांदवड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने थेट नेपाळमधील एका कांदा व्यापाऱ्याशी व्यवहार करत सुमारे साडे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नेपाळच्या व्यापाऱ्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे धाव घेत तक्रार दिली. दिघावकर यांनी पडताळणी करत तत्काळ ग्रामीण पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी त्या संशयित व्यापाऱ्याला हुडकून काढत त्याने नेपाळच्या व्यापाऱ्याची फसवणूक करत लांबविलेले साडेसहा लाखांची रक्कम परत केली.
ठळक मुद्देप्रताप दिघावकर यांचा दणका : ग्रामीण पोलिसांनी वेगाने फिरविली तपासचक्रे