लोकमत न्यूज नेटवर्कनेऊरगाव : येथील शेतकरीपुत्र डॉ. आप्पासाहेब कदम यांंना अमेरिकेच्या मेडिसीन फॉर आॅल इन्स्टिट्यूट (एम ४ आॅल), व्हीसीयू, रिचमंड येथे पोस्ट डॉक्टर्स वैज्ञानिक म्हणूून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. डॉ. कदम हे कोरोना विषाणू तसेच एचआयव्ही औषध विकासावर अमेरिकेत संशोधन करणार आहेत.डॉ. कदम यांनी पुणे येथे औषधनिर्माण क्षेत्रात पीएच. डी. पूर्ण केल्यानंतर स्वाइन फ्ल्यू, स्त्रियांचे कॅन्सर लस निर्मितीवर संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल थेट अमेरिका येथील रिसर्च सेंटरने घेतली आहे. पुणे येथे सी. एस. आय. आर. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत बेसिक केमिकलवर डॉ. कदम यांनी संशोधन केले आहे. शिक्षण सुरू असताना औद्योगिक आणि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना पुढील संधी प्राप्त करण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या रिसर्च सेंटरकडे अर्ज केला होता. अमेरिका रिसर्च सेंटरने दोन वेळा त्यांची आॅनलाइन मुलाखत घेतली व एक वर्षासाठी अमेरिका रिसर्च सेंटरला कोरोना विषाणू, एचआयव्ही औषध संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.