नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची जु. स. रु ंग्टा हायस्कूलची नवीन अद्ययावत इमारत एक वर्षात पूर्ण होणार आहे, यासाठी माजी विद्यार्थी व समाजातूनही पुढाकार घेतला जात असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर यांनी केले. अशोकस्तंभ येथील जु. स. रु ंग्टा हायस्कूलच्या नूतन इमारतीचे बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. काकतकर बोलत होते. यावेळी उद्योजक अरु णकुमार रु ंग्टा व चंद्रलेखा रु ंग्टा यांच्याप्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, अॅड. नागनाथ गोरवाडकर, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, माजी विद्यार्थी वनाधिपती विनायकदादा पाटील उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे पुष्पावती रु ंग्टा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पुष्पावती गीताने स्वागत केले. कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे यांनी संस्थेच्या शतक महोत्सवात राबविण्यात येणाºया विविध उपक्र मांची माहिती दिली. यावेळी शाळेच्या शतक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष विनायक गोविलकर, प्रवीण बुरकुले, संजय परांजपे, मिलिंद काचोळे, डॉ. सारंग इंगळे, जयंत मोंढे, उदय शेवतेकर, अरु ण पैठणकर, अशोक कटारिया, मनोज टीबरेवाला, माजी आमदार नितीन भोसले, नगरसेवक योगेश हिरे, जय व्यास, मधुकर बापट, बाळकृष्ण कुलकर्णी, मंदार देशमुख, शंतनू देशपांडे, प्रमोद पुराणिक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रे टरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. वैशाली गोसावी यांनी आभार मानले.
रुं ग्टाची नूतन इमारत एक वर्षात पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:22 AM