शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून  नवीन ड्रेनेज लाईन ; नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:36 AM

श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.

इंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.श्रद्धाविहार कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगले, अपार्टमेंट आणि सोसायट्या असून, शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहेत. शिवम पार्क फोरचूनर यासह विविध अपार्टमेंट असून फोरचूनर अपार्टमेंटलगत असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये ड्रेनेजचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. या भागात दुर्गंधी व अस्वच्छेमुळे डेंग्यूसदृश आजाराचे सुमारे सात ते आठ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या संदर्भात महापालिकेच्या अ‍ॅपवर तसेच स्थानिक नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता, उलट दिवसेंदिवस आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. या भागात ड्रेनेजची नवीन पाइपलाइन टाकून मोकळ्या प्लॉटमध्ये सोडण्यात येणारे पाणी रोखण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात आला होता. परंतु काही नागरिक ड्रेनेज टाकण्यास विरोध करीत असल्यामुळे काम सुरू करण्यास अडथळा निर्माण झाला होता. अखेर पोलीस बंदोबस्तात काम करण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आल्याने नगरसेवक श्याम बडोदे यांनी पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक श्याम बडोदे, पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील बोडके यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.लक्ष वेधलेपूर्व प्रभाग समितीच्या सभेत फोरचूनर अपार्टमेंटच्या लगत मोकळ्या प्लॉटमध्ये सोडण्यात आलेल्या ड्रेनेजच्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरूनसुद्धा मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काम होत नसल्याने नगरसेवक सतीश सोनवणे, दीपाली कुलकर्णी यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याचाच परिणाम म्हणून सदरचे काम हाती घेण्यात आले त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक