शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्याप्रकारे फसवणूक करत आर्थिक लूट करण्याचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये संपत्तीशी संबंधित असो अथवा खरेदी-विक्रीचे व्यवहार असो किंवा सायबर गुन्हे अशा सर्वांचाच समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये काही नवीन गुन्हेगार सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. या गुन्हेगारांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
अलिकडेच अंबड, इंदिरा नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आले. मिर्ची खरेदीचा बनाव करत हजारो ते लाखो रुपयांना परराज्यातील व्यापाऱ्यांना ‘चुना’ लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत एकसमान संशयित लबाडाचे नाव समोर आले आहे. शेतमालाला चांगला भाव देत ते खरेदी करण्याच्या नावाने व्यापाऱ्यांना गंडा घालणारा ‘मोहसिन’नावाचा संशयित आहे तरी कोण? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे; मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही.
अशाचप्रकारे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्येही लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच वाढ झाल्याचे दिसते. राजरोस पादचारी ज्येष्ठ महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र हिसकावून चोरटे दुचाकीवरून पोबारा करत आहे. पंचवटी पोलीस ठाण्यासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील चेनस्नॅचिंगच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत.
---इन्फो---
खबऱ्यांचे नेटवर्क व्हावे बळकट
गुप्त माहिती देणारे पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क काहीसे कमकुवत होत चालले आहे. शहर गुन्हे शाखांच्या सर्वच युनिटसह विविध पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकांनाही आपले खबऱ्यांचे नेटवर्क गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी बळकट करावे लागणार आहे.
--इन्फो--
गुन्हेगारीत नवे चेहरे आले का?
लॉकडाऊन शिथिलतेनंतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश गुन्ह्यांमध्ये नवीन चेहरे सहभागी असल्याचे दिसून येत आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यांसह चोऱ्या, घरफोड्यांमध्येही काही नवीन चेहरे समाविष्ट झाल्याची चर्चा आहे.
बनावट दस्तऐवजांच्या आधारे संपत्ती लाटणाऱ्यांच्या टोळीमध्येही बहुतांश नवीन गुन्हेगार सहभागी झाल्याचे बोलले जात आहे. या नवीन चेहऱ्यांना हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे.
--
-कोट--
घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांमध्ये नवीन गुन्हेगार आल्याचे दिसत नाही; मात्र संपत्तीशी संबंधित गुन्हे अथवा गैरव्यवहारांमधील आर्थिक फसवणुकीसारख्या गुन्ह्यांत काही नवीन चेहरे सक्रिय झाले आहेत. पोलिसांकडून सातत्याने अशा नवीन चेहऱ्यांचा माग वेगवेगळ्या पद्धतीने काढला जात असून, त्यांना बेड्या ठोकण्याची कारवाई सुरू आहे.
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त
---कोट--
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे, तसेच बेरोजगारीची समस्याही वाढली आहे. यामुळे नोकऱ्या, रोजगाराच्या शोधात तसेच कर्जाची समस्या सोडविण्यासाठी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबीयातील तरुण कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या लालसेने वाम मार्गावर जाण्याचा धोका वाढला आहे.
- डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ज्ञ.
---
आलेख २०१९ - २०२०- २०२१- मे पर्यंत
खून - २० - २३ - --- -----
दरोडे - १५ - ११ - -- ----
चोऱ्या - ४२९ - २०९ - --- --
सोनसाखळी चोरी- ८२ - ९४ - --- ---
घरफोड्या- २४२ - २२७ - --- ---
वाहनचोरी- ४६६ - ३८६---- ----
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न- ६६ - ४८-- - --- ---
===Photopath===
190621\19nsk_14_19062021_13.jpg
===Caption===
डमी- गुन्हेगारीतही नवे चेहरे