उपजिल्हा रुग्णालयात ५० जास्तीच्या खाटांचे कोविड सेंटर सुरू झाल्यामुळे तालुक्यातील रुग्णांना वेळीच उपचार मिळेल व बेडची समस्या यामुळे दूर होईल असा विश्वास आमदार डॉ.आहेर यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी महेश पाटील उपस्थित होते. आहेर यांनी डयुरा सिलिंडर व ऑक्सिजन लाईनच्या कामाची पाहणी केली व सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.सुशीलकुमार शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, माजी तालुका अध्यक्ष सुनील शेलार, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत ठाकरे,नीलेश काळे, पटेल, नितीन फंगाळ,गणेश पारवे, विशाल पाटील, किरण बोरसे तसेच सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
फोटो- २८ चांदवड कोविड-२
चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात जास्तीच्या पन्नास खाटांच्या कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार डॉ. राहुल आहेर. समवेत प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, डॉ.सुशीलकुमार शिंदे आदी.
===Photopath===
280421\28nsk_28_28042021_13.jpg
===Caption===
फोटो- २८ चांदवड कोविड-२चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात जास्तीच्या पन्नास खाटांच्या कोविड सेंटरची पाहणी करतांना आमदार डॉ. राहुल आहेर. समवेत प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, डॉ.सुशीलकुमार शिंदे आदी.