सिन्नर : शहरासह तालुक्यात सोमवारी कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. आत्तापर्यंत एका दिवसात रुग्णवाढीचे सर्व उच्चांक मागे टाकत ६३ रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०२ झाली आहे.शहरातील शिवाजीनगर येथील ५५,५१ व २८ वर्षीय पुरुष, ५४,५०,४६,२४ व २० वर्षीय महिला, गंगावेस येथील ३५ ३४ व २४ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, रेणुकानगर येथील ५६ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, एस.टी.कॉलनीमधील ५० वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील २९ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय महिला, अश्वीनाथ नगर येथील साडेचार वर्षीय मुलगा, ३१ वर्षीय पुरुष, खडकपुरा येथील ५०, ४५ व २१ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, जाखडी गल्ली येथील ५४ वर्षीय पुरुष, कानडी मळा येथील साडेचारवर्षीय मुलगी व २३ वर्षीय तरुणी, विजयनगर येथील ६० व ५२ वर्षीय पुरुष, याशिवाय शहराच्या अन्य भागातील ७५ व २९ वर्षीय पुरुष, ७०, ३१ व २२ वर्षीय महिला असे एकुण ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ग्रामीण भागात पास्ते येथील अडीच वर्षाचा मुलगा, २५ वर्षाचा तरुण व पन्नास वर्षीय महिला, मानोरी येथे ३३ व ५८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, कणकोरी येथील २० वर्षीय तरुण, मनेगाव येथे ५५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, १६ व १५ वर्षीय मुले, १८ व १३ वर्षीय मुली, नांदूरशिंगोटे येथे ५८,४०,२८ वर्षीय महिला, २० वर्षीय तरुण व ४ वर्षीय मुलगी, शहा येथे २३ वर्षीय महिला व २ वर्षाचा मुलगा, डुबेरे येथे २६ वर्षीय पुरुष, वडझिरे येथे 35 वर्षीय पुरुष, ठाणगाव येथे५२ वर्षीय पुरुष, निºहाळे येथे २२ वर्षीय तरुणी, ७ वर्षीय मुलगी, बारागाव पिंप्री येथे ४९ वर्षीय पुरुष, विंचूरदळवी येथे २७ वर्षीय महिला व २ वर्षीय मुलगी, पांढुर्ली येथे ३० वर्षीय महिला, ४ व ५ वर्षीय मुली असे ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.च्दुपारपर्यंत केवळ ५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, मात्र रात्री उशिरा आलेल्या तपासणी अहवालांमध्ये तब्बल ५८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणाही चक्रावूून गेली. आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील ३० असे एकूण ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.च्६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप ३२ जणांच्या अहवालाची आरोग्य विभागास प्रतिक्षा आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ४०२ झाली असून आत्तापर्यंत २६६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
सिन्नर तालुक्यात कोरोना बाधितांचा नवा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 2:21 AM
सिन्नर शहरासह तालुक्यात सोमवारी कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. आत्तापर्यंत एका दिवसात रुग्णवाढीचे सर्व उच्चांक मागे टाकत ६३ रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०२ झाली आहे.
ठळक मुद्देएका दिवसात ६३ : रुग्णसंख्या चारशे पार