मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे; परंतु ढगाळ वातावरणामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सुरक्षित राहील की नाही या चिंंतेने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा हवामानाच्या बदलाचा परिणाम थेट कांदा पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी उत्पादन घटल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे. मानोरी खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. कांद्याला शेवटच्या एक ते दोन पाण्याचा ताण पडल्याने निम्म्याहून जास्त शेतकºयांचे कांदा पीक करपून गेले आहे. हवामान बदलाचा परिणाम होऊ नये म्हणून शेतकºयांनी वेळेवर महागडी कीटकनाशके, औषध फवारणी करूनदेखील उत्पादनात घट झाली असल्याची माहिती येथील शेतकºयांनी दिली. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन पैसे मिळावे म्हणून मजूर वर्ग रणरणत्या उन्हाची पर्वा न करता काम करताना दिसून येत आहे. कांद्याला योग्य भाव नसल्याने नव्याने चाळी उभारून कांदा साठवणुकीवर भर देताना मानोरी परिसरातील शेतकरी दिसून येत आहे. ज्या शेतकºयांकडे कांदाचाळ नाही ते काढलेला कांद्याचे पोळ पाथीच्या साहाय्याने झाकून ठेवत आहेत. मात्र उन्हाच्य तीव्रतेमुळे कांदा सुकून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतमालात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. साठवून ठेवलेल्या कांद्याला या हंगामात योग्य भाव मिळत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. दमट हवामानामुळे कांदा चाळीत सडू नये यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्न करतान दिसत आहे.
नवीन कांदा : ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतित भाव मिळत नसल्याने साठवणुकीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:46 AM
मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
ठळक मुद्दे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे