शरदचंद्र खैरनार / लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व शेतीच्या हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रविवारी (दि.७) मार्चला सकाळी सव्वाआठ वाजता आतापर्यंतची सर्वात उच्चांकी ८ हजार १०४ मेगावाट वीज निर्मिती झाली. याआधी २० मे २०१९ रोजी ७ हजार ६११ मेगावाट वीज निर्मिती झाली होती. त्या तुलनेत ४९३ मेगा वॅट जादा वीजनिर्मिती करुन मागील रेकॉर्ड ब्रेक केले आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली. यानिमित्ताने महानिर्मितीच्या सर्वच औष्णिक विद्युत केंद्रांची उल्लेखनिय होत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काही संचांचा भारांक ९० टक्केपेक्षा अधिक आहे. त्यात भुसावळ युनिट चार ९४ टक्के, युनिट पाच ९८.९६ टक्के, चंद्रपूर युनिट आठ ९९.९४ टक्के, युनिट नऊ ९५.५५ टक्के, खापरखेडा युनिट तीन ९१.१६ टक्के, युनिट पाच ८९.९५ टक्के, पारस युनिट तीन ९५.४२ .टक्के, परळी युनिट सहा ९१.१६ टक्के, युनिट आठ ९४.४८ .टक्के यांचा समावेश आहे.काही ठिकाणचे संच जुने व वकालबाह्य होत असले तरीही वीज उत्पादनात कमी नाहीत.अशीच कामगिरी असली तर महानिर्मितीचा सुवर्णकाळ पुन्हा येईल अशी खात्री तज्ञांनी दिली आहे.रविवारी झालेले विक्रमी उत्पादन असेnनाशिक- युनिट चार १७६, युनिट पाच १८५ अशी एकूण ३६१ मेगावॉट. nकोराडी- युनिट सहा १८०, युनिट सात १४१, युनिट आठ ५४२, युनिट नऊ ५२१, युनिट दहा ५४२ अशी एकुण १९२५ मेगावॉट. nखापरखेडा- युनिट एक १४३, युनिट दोन १५०, युनिट तीन १६६, युनिट चार १७५, युनिट पाच ४६३ अशी एकुण १०९८ मेगावॉट. nपारस- युनिट तीन १२४, चार २२० अशी ३४३ मेगावॉट. nपरळी- युनिट सहा २३०, युनिट सात २३०, युनिट आठ २३० अशी एकुण ६८९ मेगावॉट. nचंद्रपूर- युनिट तीन १३६, चार १३८, पाच ४०१, युनिट सहा ४०३, युनिट आठ ४८१, युनिट नऊ ४३६ अशी १९९५ मेगावॉट. nभुसावळ- युनिट तीन १७१, युनिट चार ४५१, युनिट पाच ४७२ अशी एकुण १०९४ मेगावॉट. म्हणजेच थर्मल ग्रॉस ८१०४ अशी उच्चांकी वीज निर्मिती झाली आहे.
राज्यात वीजनिर्मितीचा नवा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 1:43 AM
उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व शेतीच्या हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रविवारी (दि.७) मार्चला सकाळी सव्वाआठ वाजता आतापर्यंतची सर्वात उच्चांकी ८ हजार १०४ मेगावाट वीज निर्मिती झाली.
ठळक मुद्दे८ हजार ४०१ मेगावॉट : मागणी वाढल्याने महानिर्मितीची धडपड कामी