------------------------
प्राज्नता पवार यांची निवड
सिन्नर : शिवशंभू पालखी सोहळा समितीच्या वतीने सिन्नर तालुका युवती अध्यक्षपदी मुसळगाव येथील प्राज्नता पवार यांची निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांचा ज्वलंंत इतिहास लहान मुलांसह तरुण पिढीच्या मनात रुजावा या हेतूने वढू, आळंदी ते श्रीक्षेत्र रायगड पालखी सोहळा समिती आयोजित शिवशंभू स्वराज्य ऐतिहासिक लेखापरीक्षा २०२१ आयोजन करण्यात आले आहे.
----------------------
तलाठ्याच्या दिलगिरीनंतर ‘प्रहार’चे उपोषण सुटले
सिन्नर : शहा येथील तलाठ्याने यापुढे सातबारा उतारा देण्यासाठी १५ रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारणार नसल्याचे आश्वासन ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिल्याने प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले. दिव्यांग पंकज पेटारे हे तलाठी कदम यांच्याकडे उतारा मागण्यास गेले असता त्यांना अपमानास्पद वागणूक देत मानिसक त्रास दिला. त्यामुळे तलाठ्यावर कारवाई व्हावी, दिव्यांगांना मोफत घरपोच उतारे मिळावेत यासाठी ‘प्रहार’च्या वतीने उपोषण करण्यात आले होते.
----------------------
शेतीची हद्द कायम करण्यासाठी आंदोलन
सिन्नर : तालुक्यातील देशवंडी येथील सेवारत सैनिक ज्ञानेश्वर कापडी यांच्या शेतीत हद्द कायम करण्याच्या मागणीसाठी त्रिदल सैनिक सेवा संघ, सिन्नर तालुका माजी सैनिक संघ यांच्या वतीने तहसील व भूमी अभिलेख कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत तहसीलदार राहुल कोताडे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
-----------------------
कमी वजनाच्या सात बालकांना जीवदान
सिन्नर : येथील डॉ. अंजली- विष्णू हॉस्पिटलमध्ये एक किलोपेक्षाही कमी वजनाच्या ७ बालकांना जीवदान देण्यात आले. यामध्ये ८०० व ८५० ग्रॅमचे प्रत्येकी एक, ९०० ग्रॅमचे तीन, तसेच एक किलो वजनाच्या दोन बालकांचा समावेश असल्याची माहिती डॉ. विष्णू धादवड व डॉ. अंजली धादवड यांनी दिली. अंजली विष्णू हॉस्पिटलमध्ये न्यूरोडेव्हलपमेंट व हाय रिस्क बेबी सेंटरमुळे अनेक बाळांना याचा फायदा झाला आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना अंजली विष्णू हॉस्पिटलमध्ये लाभ देण्यात येत आहे.