----
हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून महानगरातील सर्व सहा विभागांमधील अमरधाममध्ये विद्युतदाहिनी उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यवरण मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून राज्यातील सहा शहरांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नाशिक महानगरासाठी २० कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रत्येक विभागातील स्मशानभूमीत याप्रकारे सहाही विभागांत नवीन वर्षात विद्युतदाहिनी उभारण्यात येणार आहेत.
--------------
रामकुंडात जाणार नाही गटारीचे पाणी
नाशिकमधील सर्वाधिक पवित्र स्थान तसेच देशविदेशातील भाविकांची श्रद्धा असलेल्या रामकुंडात आता पंचवटी परिसरातून येणारे गटारीचे पाणी मिसळले जाणार नाही. यापूर्वी जमिनीखालून वाहणारी एक खुली गटारलाइन ही रामकुंडाजवळून जात असल्याने पाणी वाढल्यास किंवा पावसाळ्यात त्यातील पाणी काही प्रमाणात रामकुंडात मिसळले जात होते. मात्र, आता त्या ड्रेनेजलाइनची दिशा बदलून अहिल्या राम व्यायामशाळेजवळून थेट वाघाडीपर्यंत नेण्यात आल्याने रामकुंडाच्या पाण्याचे पावित्र्य कायम राहू शकणार आहे.