येवला : दुरावत असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल पुढे सरसावले असून, ग्राहकांची मोफत बोलण्याची हौस आता केवळ लॅण्डलाइन दूरध्वनीवरून बीएसएनएल पूर्ण करणार आहे.सध्या जिल्ह्यात केवळ दोन ते अडीच लाख लॅण्डलाइन दूरध्वनी ग्राहक असून, सध्याच्या मोबाइलच्या जमान्यात लॅण्डलाइन दूरध्वनी पिछाडीवर पडले आहेत. लॅण्डलाइनच्या या पुनरुज्जीवनासाठी दूरसंचार खात्याने कंबर कसली असून, १ मेपासून देशातील कुठल्याही राज्यातील बीएसएनएलधारक रात्री ९ ते स. ७ या वेळेत इतर लॅण्डलाइनसह दुसऱ्या कंपनीच्या मोबइलवर मोफत बोलता येणार आहे. सध्या बीएसएनएल लॅण्डलाइनचा वापर फक्त ब्रॉडबॅण्ड इंटरनेटसाठी ग्राहक करीत आहेत. याशिवाय आता इतर मोबइल कंपन्या कमी दरात इंटरनेट सुविधा देत असल्याने ग्राहकांचा लॅण्डलाइन तसेच ब्रॉडबॅड सुविधेकडील ओढा कमी होत आहे. ग्राहकांनी लॅण्डलाइनची जोडणी तोडण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचारचा नवा फंडा
By admin | Published: April 17, 2015 11:52 PM