नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.१) एकूण ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नवीन बाधित त्या तुलनेत दीडपट म्हणजे १०२ आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना उपचारार्थींची एकूण संख्या पुन्हा १०१७ वर पोहोचली आहे. तर पुन्हा ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५८३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात दिवसभरात नवीन बाधित महिन्यानंतर पुन्हा शंभरावर पाेहोचले. त्यामुळेच एकूण उपचारार्थींच्या संख्येनेदेखील एक हजाराचा टप्पा पार केला. दरम्यान, एकूण उपचारार्थी १०१७ पैकी नाशिक ग्रामीणचे ४९६, नाशिक मनपाचे ४५९, मालेगाव मनपाचे ४७ तर जिल्हाबाह्य १५ रुग्णांचा त्यात अंतर्भाव आहे. दरम्यान, जिल्ह्यात प्रलंबित अहवालांची संख्या ७८९ वर पोहोचली असून त्यात नाशिक ग्रामीणचे ३४४, नाशिक मनपाचे २११, मालेगाव मनपाचे २३४ अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुक्त नागरिकांच्या प्रमाणात अल्पशी घट येऊन हे प्रमाण ९७.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.