शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

वृत्तपत्र विक्रेत्यांनी लुटला सायकल स्पर्धेचा आनंद

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM

‘सायकल राजा’ : मकरंद उगले प्रथम, किरण मराठे द्वितीय

नाशिक : पेपर वितरकांची ‘सायकल राजा’ स्पर्धा नाशिक सायकलिस्टच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांकडील सायकलवर पेपर टाकणारी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.शहरातील गोदाकाठालगत सकाळी नऊ वाजता आनंदवली-मखमलाबाद जोड रस्त्यावर सायकल स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला महापौर अशोक मुर्तडक यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, राज लुथरा आदि उपस्थित होते. दरम्यान, सहभागी शंभर स्पर्धकांना टी-शर्ट, हेल्मेटचे वाटप करण्यात आले. एकूण दहा किलोमीटरचे अंतर या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले होते. बोट क्लब पूल, चांदशीरोड, मुंगसरारोड, भाग्योदय कॉलनीमार्गे पुन्हा बोट क्लब पूल असा सायकल फेरीचा मार्ग होता. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते वयोवृध्द नागरिकदेखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत मकरंद उगले (प्रथम), किरण मराठे (द्वितीय), नीलेश ठाकरे (तृतीय) या विजेत्यांना अनुक्र मे रुपये तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये रोख असे बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रॅम विजेते सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, मनीषा रौंदळ, सुनील खालकर, दत्तू आंधळे, नाशिक वृत्तपत्र वितरक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सरचिटणीस विनोद पाटील, रमेश महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.