लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वर्तमानपत्राद्वारे कोरोना पसरत नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याने त्याविषयी शंका बाळगण्याची गरज नसून वाचकांनी व्हायरसमुक्त आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रे वाचनाची भूक निर्धास्तपणे भागवावी, असे स्पष्टीकरण जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टरांनी दिले आहे.यासंदर्भात आपले मत व्यक्त करताना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्र व्हायरसमुक्त असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. तरीदेखील छपाईपासून वितरकांपर्यंत पोहोचेपर्यंत ‘लोकमत’ वर्तमानपत्र सॅनिटाइज केले जाते आणि त्यानंतर वाचकांपर्यंत नेण्यासाठीही आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे वाचकांनी निर्धास्त होऊन वृत्तपत्र वाचनाची आपली सवय जपणे गरजेचे आहे, असे डॉ. महाले यांनी सांगितले.येवला येथील शाह हॉस्पीटल अॅण्ड क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. स्वप्नील शाह यांनी सांगितले की, गर्दीत जाणे टाळून तसेच शारीरिक अंतर राखत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत काळजी घेतली तरीदेखील आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रातून विशेषत: ‘लोकमत’मधून नेहमीच सकारात्मक, प्रबोधनपर व लोकहिताची वृत्ते प्रसिद्ध होत असतात. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत असणारे संभ्रम, अज्ञान दूर करण्यात ‘लोकमत’चा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत वर्तमानपत्रामुळे कोराना झाल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. सर्व नियम पाळून, सॅनिटाईज होऊन वर्तमानपत्र वाचकांपर्यंत येत असते. त्यामुळे विश्वासार्ह माहितीसाठी वर्तमानपत्र वाचले पाहिजे, असे येवला येथील डॉ. स्वप्नील शाह यांनी नमूद केले.महत्त्वाचा दस्तावेजजगातील घटना, घडामोडींची वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी वर्तमानपत्रे पार पाडत आहेत. तसेच वृत्तपत्र हा महत्त्वाचा दस्तावेज असल्याने तो संग्राह्यही ठेवता येतो. वृत्तपत्र समाज शिक्षणाचे साधन असून, यामुळे त्याची विश्वासार्हता टिकून आहे. परिणामी आजही घरोघर वाचकांनी वृत्तपत्र वाचणे आवश्यक आहे, असे डॉ. हितेश महाले यांनी स्पष्ट केले.
वर्तमानपत्रे व्हायरसमुक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:10 PM
नाशिक : वर्तमानपत्राद्वारे कोरोना पसरत नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याने त्याविषयी शंका बाळगण्याची गरज नसून वाचकांनी व्हायरसमुक्त आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रे वाचनाची भूक निर्धास्तपणे भागवावी, असे स्पष्टीकरण जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टरांनी दिले आहे.
ठळक मुद्देमान्यवर डॉक्टरांचे स्पष्टीकरण : वाचकांनी निर्धास्त राहावे