वणी : परिसरात दुसºया दिवशी तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शुक्र वारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर नव्हता मात्र पावसाळी वातावरण हे द्राक्ष पिकांना प्रतिकुल मानन्यात येते. डिसेंबर महिन्यात तालुक्यातील काही भागातील द्राक्षे विक्र ी होण्याची शक्यता आहे. कारण साखर पुर्णत: द्राक्षांमधे उतरली नाही किंवा परिपक्वपणे तयार झाली नसली तरी अशा द्राक्षाना बांगला देशात मागणी असते. कारण शाकाहारी अन्न न खाणारे लोक अशा द्राक्षाचे सेवन करतात. कारण त्या प्रकारचे अन्न पचविण्याचा गुणधर्म त्या द्राक्षामधे असतो अशी माहिती एका उत्पादकाने दिली. दरम्यान अशा द्राक्षांनाही सद्यस्थितीतील वातावरण हे मारक आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात घट येऊ नये म्हणुन महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. एवढे करु नही उत्पादन घेतेवेळी निसर्गाची लहर सांभाळावी लागते. ही सगळी स्थिती द्राक्ष उत्पादकांना मारक अशीच असल्याने काळजीचे काळे ढग उत्पादकांच्या चेहºयावर दिसत आहेत.
वणी परिसरात दुसऱ्या दिवशी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 2:26 PM