टाटा रॅलीज इंडिया लि. (धान्य सीड्स) यांच्या सौजन्याने सामाजिक दायित्व निधीतून जीवनावश्यक घरगुती किराणा साहित्याच्या किट्स वाटपाचा कार्यक्रम भुसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. याप्रसंगी संजय दुसाणे, प्रमोद शुक्ला, अनिल पवार, माणिक देशमुख, डिगंबर बच्छाव, स्वप्नील केले, नानासाहेब आंधळे, सचिन पगार, बाळासाहेब शिरसाठ, सुनील बोरसे, गुलाब निकम, अनिल निकम, दीपक मालपुरे आदी उपस्थित होते. राज्यावर येणाऱ्या विविध संकटांचा मुकाबला करत शासन सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री भुसे यावेळी म्हणाले. यावेळी साखर, तेल, तांदूळ, डाळी, मसाल्यासह किराणातील जीवनावश्यक १३ वस्तूंचा समावेश असलेल्या सुमारे ५०० किटचे वितरण करण्यात आले.
इन्फो
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
आधुनिक पद्धतीची रुग्णवाहिका मालेगावकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगताना भुसे म्हणाले, कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण चांगली माणसे गमावली आहेत. महामारीचा मुकाबला करण्यासाठी मालेगाव प्रशासनामार्फत चांगले काम झाले असून यापुढे अशा संकटांचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत. बिसाइड यू कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या रुग्णवाहिका सेवा रुग्णांना नक्कीच दिलासा देतील, असा विश्वासही भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, वडनेर खाकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल जैन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५० हजारांचा धनादेश राज्याचे कृषीमंत्री भुसे यांच्याकडे सुपूर्द केला.