सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील निकवेल सरवर परिसरातील डोंगरावर काही माथेफिरूंनी आग लावल्याने सुमारे तीस हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना आग लावून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.दरम्यान, घटनास्थळावरून अटक केलेल्या माथेफिरूंना सटाणा न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. निकवेल सरवर येथील तौल्या डोंगरावर अचानक वनवा पेटला. राखीव वनक्षेत्रात अग्नितांडव सुरू असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. आग विझविण्यासाठी वनविभागाच्या पथकासह नागरिकांनी डोंगराकडे धाव घेतली. सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. वनपाल जयप्रकाश शिरसाठ, वैभव हिरे यांच्यासह वनरक्षक नवनाथ मोरे, प्रफुल्ल पाटील, किशोर मोहिते व परिसरातील वनमजूर घटनास्थळी आग आटोक्यात आणत असतानाच तेथे विठ्ठल प्रताप माळी (३५) राहणार निकवेल हा तरु ण संशयास्पदरीत्या आढळून आला होता. वनपाल जयप्रकाश शिरसाठ यांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. वनअधिकाऱ्यांनी त्वरित हालचाली करून भावडू आप्पा सोनवणे (३०), गोरख आत्माराम वाघ (२७) दोघे राहणार निकवेल यांना ताब्यात घेतले. या आगीत सुमारे तीस हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली.तिघांविरुद्ध गुन्हा दाखलवनविभागाच्या अधिकाºयांनी याप्रकरणी अटक केलेल्या तिघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांना सटाणा न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीला निकवेल, दहिंदुले येथील ग्रामस्थांनी मोलाची कामगिरी बजावली. या घटनेचा अधिक तपास सटाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक किशोर मोहिते करीत आहेत.
निकवेल वनक्षेत्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:41 PM
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील निकवेल सरवर परिसरातील डोंगरावर काही माथेफिरूंनी आग लावल्याने सुमारे तीस हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक ...
ठळक मुद्देतिघे ताब्यात । ३० हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा खाक