निफाड : शाळांना प्रचलित पद्धतीने टप्प्यावर अनुदान म्हणजे १०० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबईला पायी जाणारे नवयुग क्र ांती संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे व त्यांचे सहकारी शिक्षक वसंत पानसरे, अमोल निकम, अनिस कुरेशी, कमलेश राजपूत, रवींद्र महाजन हे बुधवारी (दि. ५) निफाड येथे आले असता नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने या सर्वांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला.अन्नग्रहण न करता पायी मुंबईला जाण्याचा या आंदोलनकर्त्यांचा दहावा दिवस होता. निफाड येथे चंद्रकांत कुशारे, संजय गिते यांचे नेतृत्वाखाली बाबा गुंजाळ, महेश अहिरे, सोमनाथ मत्सागर, हिरामण चौधरी, भाऊसाहेब तांदळे, राजेंद्र उगले, गोविंद कांदळकर, जगदीश देशमुख, सोनार, युवराज गायकवाड, दिवाकर शेजवळ, कल्पेश रायते, के. एस. चौधरी, महाले, कराड, प्रा. ज्ञानेश्वर गिते आदींनी भेट घेतली. नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ मुख्याध्यापक संघाचे वतीने गजानन खैरे यांच्या या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.याप्रसंगी पायी जाणाºया आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या मदतीसाठी शिक्षकांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.याप्रसंगी निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी या शिक्षकांची भेट घेतली. गजानन खैरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन रेड्डी यांना दिले. त्यानंतर निफाडहून ही पदयात्रा नाशिककडे रवाना झाली.
विविध मागण्यांसाठी मुंबईला पायी जाणाऱ्या शिक्षकांचे निफाडला स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:40 IST
निफाड : शाळांना प्रचलित पद्धतीने टप्प्यावर अनुदान म्हणजे १०० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबईला पायी जाणारे नवयुग क्र ांती संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे व त्यांचे सहकारी शिक्षक वसंत पानसरे, अमोल निकम, अनिस कुरेशी, कमलेश राजपूत, रवींद्र महाजन हे बुधवारी (दि. ५) निफाड येथे आले असता नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने या सर्वांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला.
विविध मागण्यांसाठी मुंबईला पायी जाणाऱ्या शिक्षकांचे निफाडला स्वागत
ठळक मुद्देऔरंगाबाद येथून आंदोलन सुरू : आंदोलकांना आर्थिक मदत