भाऊसाहेबनगर : घुगे गुरुजी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा निफाडभूषण पुरस्कार हा सन्मानीय व्यक्तींना देऊन त्यांचा केलेला गौरव ही बाब संस्थेच्या आणि त्या मान्यवरांसाठी उचीत सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.घुगे गुरुजी भाग्यश्री पतसंस्थतर्फे दिला जाणारा निफाडभूषण पुरस्कार तुकाराम दिघोळे आणि नीलिमा पवार यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम होते.यावेळी जि.प.अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार सुधीर तांबे, माणिकराव बोरस्ते, आमदार अनिल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम दिघोळे आणि नीलिमा पवार यांनी सत्काराला उत्तर दिले.घुगे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार थोरात, शीतल सांगळे आदींनी पतसंस्था प्रांगणातील पुतळ्याचे पूजन करून आदरांजली वाहिली. उगाव रोडवरील ज्ञानदीप इंग्लिश मीडिअमच्या नूतन इमारतीचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी हेमंत धात्रक, राजाभाऊ पानगव्हाणे, आत्माराम कुंभार्डे, पंढरीनाथ थोरे, शरद आहेर, जगन पाटील भाबड, सुरेश कमानकर, सुभाष कराड, दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, अॅड. पी. आर. गिते, अॅड. का.का. घुगे, अॅड. ना.भा. ठाकरे, अॅड.इंद्रभान रायते, मनोहरशास्त्री सुकेणकर, निवृत्ती धनवटे, प्रकाश घुगे, रत्नाकर चुंबळे, चिंतामण सोनवणे, बबनराव सानप, जगनअप्पा कुटे, प्रकाश बाजारे, प्रल्हाद गडाख, बाळासाहेब क्षीरसागर, मुकुंदराजे होळकर, मधुकर शेलार, सुरेश घुगे, रंगनाथ पडोळ आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक पतसंस्था अध्यक्ष रमेशचंद्र घुगे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ मत्सागर यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष खंडेराव पाटील चव्हाण यांनी मानले. योग्य व्यक्तींचा सन्मान : थोरातच्बाळासाहेब थोरात म्हणाले, तुकाराम दिघोळे आणि नीलिमा पवार ही व्यक्तिमत्त्व त्या उंचीची आहेत. दिघोळेंनी दुष्काळी तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारणीत सिंहाचा वाटा उचलला तर नीलिमा पवार यांनी मविप्रत तोडीसतोड काम करून एक आदर्श घालून दिला आहे. हा योग्य माणसांचा सन्मान आहे. राज्यमंत्री दादा भुसे यावेळी बोलताना म्हणाले, सहकारी संस्थेत काम करताना येणाऱ्या अडचणी आणि संस्थेबाबत लोकांच्या अपेक्षा या आपण या खात्याचे मंत्री म्हणून काम करताना जवळून बघितले आहे. या पार्श्वभूमीवर भाग्यश्री पतसंस्थेचे काम उल्लेखनीय आहे.
दिघोळे, पवार यांना ‘निफाडभूषण’पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:59 AM
भाऊसाहेबनगर : घुगे गुरुजी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा निफाडभूषण पुरस्कार हा सन्मानीय व्यक्तींना देऊन त्यांचा केलेला गौरव ही बाब संस्थेच्या आणि त्या मान्यवरांसाठी उचीत सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. घुगे गुरुजी भाग्यश्री पतसंस्थतर्फे दिला जाणारा निफाडभूषण पुरस्कार तुकाराम दिघोळे आणि नीलिमा पवार यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम होते.
ठळक मुद्देवितरण : घुगे गुरुजी भाग्यश्री पतसंस्थेमार्फत कार्यक्रम