निफाड : देशभरात जमावाकडून होणाऱ्या घटनांच्या विरोधात सोमवारी (दि.१५)निफाड तालुक्यातील मुस्लीम समाजबांधवातर्फे तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता.निफाड येथील मार्केटयार्डपासून या मोर्चास प्रारंभ करण्यात आला. अत्यंत शांततेत, कोणत्याही घोषणा नसलेला हा मूक मोर्चा होता. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन निफाड चे तहसीलदार दीपक पाटील यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्ग प्रामुख्याने मुस्लीम समाजास विशेष संरक्षण देण्यात यावे, मॉब लिंचींग सारखे होणारे गुन्हे थांबवण्यासाठी कायदा करण्यात यावा व दोषींविरु द्ध जलदगती न्यायालय स्थापन करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी. अल्पसंख्यांक समाजाकरीता विशेष अट्रॉसिटी कायदा बनवून होणा-या अत्याचारापासून मुक्तता मिळावी, उच्च न्यायालय मुंबई यांनी शिक्षणासाठी मंजूर केलेल्या मुस्लिम आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, गोमाता तसेच गोवंश रक्षणाच्या नावाचा गैरवापर करून मुस्लिम समाजातील मागास वर्गाची प्रतारणा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, आदी मागण्यांचा समावेश होता.याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि .दा.व्यवहारे, माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, मुकुंद होळकर, विद्यमान नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे,पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगव्हाणे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अनिल कुंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष सुधीर कराड,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर शेलार,बसपा जिल्हा अध्यक्ष आसिफ शेख,नगरसेवक देवदत्त कापसे,स्वारीपचे अनिल सोनवणे,रामनाथ शेजवळ,शिवसेनेचे विक्र म रंधवे,आनंद बीवाल,सुनील निकाळे,भगवान गाजरे,शांताराम कर्डीले,शिवसेना शहर अध्यक्ष संजय कुंदे,राजेंद्र मोगल तसेच निफाड तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाचे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
‘मॉब लिचिंग’विरोधात निफाडला मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 6:35 PM
मागण्यांचे निवेदन : मुस्लिम समाजाचा मोठा सहभाग
ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन निफाड चे तहसीलदार दीपक पाटील यांना देण्यात आले