लासलगाव : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले असून, उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे उत्तर भारतासह राज्यातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. गुरुवारी कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्र हवामान केंद्रावर ४.८ अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचा तडाखा निफाड तालुक्यामध्ये चांगलाच जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानामध्ये चांगलीच घट झाली आहे. आज निफाडमध्ये ४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मागील वर्षी १२ जानेवारी २०१७ रोजी ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. या चालू हंगामात २९ डिसेंबर रोजी ६.५ अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली होती. पुन्हा उष्णता वाढल्यामुळे १० अंशावर किमान तापमानाचा पारा गेला होता. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तपमान उणे झाल्याने गायब थंडीचे जोरदार आगमन झाले असून, मंगळवारी १०.४ अंश सेल्सिअस किमान तपमानाची तर बुधवारी ७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती. या कडाक्याच्या थंडीत तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.थंडीचा कडाका कायमहंगामातले हे सर्वात कमी ४.८ अंश सेल्सिअस किमान तपमान झाल्याने कृषी संशोधन केंद्रातील गहू पिकांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा झाल्याचे दिसत होते, तर या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला थंडीचा फायदा होणार आहे. थंडीचा तडाखा अजून जर वाढला तर नुकतीच फुगवण आलेल्या द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे. यामुळे द्राक्षांची मागणी घटते व नुकसानीलाही सामोरे जाऊ लागणार आहे.
निफाड @ ४.८ द्राक्ष, गव्हावर परिणाम; राज्यातील नीचांकी तपमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:36 PM
लासलगाव : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले असून, उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे उत्तर भारतासह राज्यातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे.
ठळक मुद्देकिमान तापमानात घट ठिकठिकाणी शेकोट्या