शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

ओझर विमानतळावर नाइट लँडिंगला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:16 AM

ओझर : येथील विमानतळावर नाइट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय ...

ओझर : येथील विमानतळावर नाइट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणेही शक्य होणार आहेत. या सुविधेमुळे ओझर विमानतळावरून पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तसेच मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा भार लक्षात घेता त्याला नाशिक हा व्यवहार्य पर्याय ठरणार आहे.

ओझर विमानतळावर नाइट लँडिंग तसेच इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, प्रवासी विमान वाहतुकीसाठी नाइट लँडिंग किंवा टेक ऑफसाठी डीजीसीएचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. ओझर विमानतळ एचएएलच्या अखत्यारित असल्याने एचएएलकडे हे प्रमाणपत्र नाही. एचएएलने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यानुसार डीजीसीएच्या अधिकार्‍यांनी फेब्रुवारी महिन्यात ओझर विमानतळाची पाहणी केली. अखेर सर्व चाचण्यांनंतर डीजीसीएने ओझर नाइट लँडिंगला परवानगी दिली. यामुळे नाशिक देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले जाणार आहे.

इन्फो

मुंबईला सक्षम पर्याय?

उडान योजनेमुळे मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक वाढल्याने अनेकदा टाइम स्लॉट देताना विलंब होतो. सद्य:स्थितीत मुंबई विमानतळावरून दररोज तब्बल ९००हून अधिक विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होते. हा सारा व्याप आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाचे काम या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईला पर्यायी विमानतळ कोणते, यासाठी गांभीर्याने विचार सुरू आहे. ओझर विमानतळावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास मुंबईला सक्षम पर्याय म्हणून हे विमानतळ उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे हवाई वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

इन्फो :

कंपन्यांना आर्थिक लाभ शक्य

मुंबईनंतर १५० किलोमीटरच्या परिघात अन्य विमानतळ नाही. सध्या अहमदाबाद विमानतळ मुंबईला पर्याय म्हणून वापरले जाते. मुंबई-अहमदाबादचे हवाई अंतर २४० मैल आहे. त्या तुलनेत मुंबईपासून नाशिकचे हवाई अंतर केवळ ९७.८ मैल आहे. त्यामुळे मुंबई-ओझर प्रवासासाठी ०.३० मिनिटे आणि ७५० लिटर इंधन लागते. याच तुलनेत अहमदाबादला ०.४६ मिनिटांचा वेळ आणि २००० लिटर इंधन लागते. त्यामुळे ओझरचा पर्याय फायदेशीर ठरेल. ओझरला येताना आणि जाताना प्रवाशी वाहतुकीतूनही विमान कंपन्यांना आर्थिक लाभही होऊ शकेल.