अझहर शेख / नाशिक : महापालिका अग्निशामक दलाच्या मुख्यालयाचा दुरध्वनी खणखणला..., ‘हॅलो, सिव्हिल हॉस्पिटलमागे एक म्हातारे बाबा खड्डयात पडले आहे, मदत पोहचवा’ तत्काळ अलार्म वाजविला जातो आणि जवान सज्ज होऊन बंब घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना होतात. सायरन वाजवित बंबाचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात प्रवेश होतो आणि थेट बंब इमारतीच्या मागील बाजूने जातो यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, नेमके काय घडले? याची कुतूहल अन् भीती निर्माण होते. काही मिनिटांतच जवानांकडून ‘रेस्क्यू आॅपरेशन’ हाती घेतले जाते. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत एका पंधरा ते वीस फूट खोल खड्डयात पडलेल्या वयोवृध्दाला बाहेर काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
रात्र काढली खड्ड्यात: अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे वाचले वयोवृध्दाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 2:34 PM
अझहर शेख / नाशिक : महापालिका अग्निशामक दलाच्या मुख्यालयाचा दुरध्वनी खणखणला..., ‘हॅलो, सिव्हिल हॉस्पिटलमागे एक म्हातारे बाबा खड्डयात पडले आहे, मदत पोहचवा’ तत्काळ अलार्म वाजविला जातो आणि जवान सज्ज होऊन बंब घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना होतात. सायरन वाजवित बंबाचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात प्रवेश होतो आणि थेट बंब इमारतीच्या मागील बाजूने ...
ठळक मुद्दे\वयोवृध्दाला बाहेर काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यशजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल