शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

रात्रीच्या वेळी मैदानात भरते मद्यपींची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:30 AM

येथील गणेश चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत बोटावर मोजण्याइतके जेमतेम विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळेला घरघर लागलेली असताना शाळेत सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी चक्क या मैदानात जुगारी तसेच मद्यपींची शाळा भरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिडको : येथील गणेश चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत बोटावर मोजण्याइतके जेमतेम विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळेला घरघर लागलेली असताना शाळेत सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी चक्क या मैदानात जुगारी तसेच मद्यपींची शाळा भरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  गणेश चौक येथे असलेल्या मनपाच्या शाळेला आधीच घरघर लागलेली असून, या शाळेत दररोज बोटावर माजण्याइतकेच विद्यार्थी शाळेत येत असल्यामुळे शिक्षकांचेही शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे. वेळ मिळेल तेव्हा शिक्षक शाळेत येत असल्याने शाळेची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. शाळेत दररोज प्रत्येक वर्गात चार ते पाच विद्यार्थी येत असल्याने शिक्षकांकडून सर्व वर्ग एकत्र करून विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. या शाळेचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असून, संरक्षण भिंतीची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी शाळेच्या आवारात सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी या शाळेच्या मैदानाचा ताबा जुगारी तसेच मद्यपींनी घेतला आहे. अंबड पोलिसांनी गेल्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सवानिमित्त गुन्हेगारांवर कारवाई केली असून, काहींना तडीपार करण्याची मोहीमही राबविली असली तरी गेल्या काही दिवसांपासून सिडकोसह परिसरात स्वत:ला भाई समजणाऱ्यांनी शाळेच्या मैदानालाच आपला अड्डा बनविला आहे. या टवाळखोरांकडून भरदिवसा महाविद्यालय परिसरासह मुख्य चौकात दहशत पसरविण्याचे प्रकार केले जात आहे. काही दिवसांपूर्वी उत्तमनगर भागात टवाळखोरांमध्ये हमरीतुमरी झाल्याचा प्रकार घडला होता. या सर्व घटना पाहता, सिडकोतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेश चौक शाळेबाबत विचार करून येथील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत वर्ग करून ही शाळा पूर्णपणे बंद करावी किंवा या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत मद्यपी तसेच जुगारींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.टवाळखोरांचा वावर वाढलाउत्तमनगर येथील सिडको महाविद्यालयाच्या बाहेरही स्वत:ला भाई समजणाºया टवाळखोरांचा महाविद्यालयाच्या वेळेत वावर वाढला आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर मुलींच्या छेडखानीचे प्रकार भरदुपारी घडत असून, त्यातूनच अनेक वेळा वाद होत असल्याचे परिसरातील दुकानदारांचे म्हणणे आहे. महाविद्यालयालगत असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या भाईगिरीचा परिणाम जाणवत आहे.

टॅग्स :SchoolशाळाPoliceपोलिस