नाशिक : पशु-पक्षी तसेच मानवी जीवितास धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापरावर सरकारने बंदी घातली आहे़ असे असतानाही मुंबईहून स्वस्तिक ट्रान्सपोर्टद्वारे नायलॉन मांजा मागवून त्याची डिलिव्हरी घेणाऱ्या सिडकोतील तिघा संशयितांकडून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मंगळवारी (दि़२५) सुमारे पाउण लाखाचा नायलॉन मांजा जप्त केला़ मुंबईहून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून नायलॉन मांजा शहरात विक्रीसाठी मागविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली होती़ त्यानुसार या मालाची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेले संशयित यश देवीदास लाड (२४, स्वामी विवेकानंदनगर), विक्रांत भालचंद्र पांगरे (२०, पांगरेमळा, सिडको) व सौरभ अशोक खोडे (१९, रा़ खोडेमळा, बडदेनगर) हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डिलिव्हरी घेण्यासाठी आले असता गुन्हे शाखेने ताब्यात घेतले़या प्रकरणी या तिघाही संशयितांवर अंबड पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोत पाउण लाखाचा नायलॉन मांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:57 PM