विद्यमान उपसभापती हेमंत बोरसे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात सहायक निबंधक के.डी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते शोभाताई निकम यांच्या नावावर एकमत व त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी निकम यांचा कळवण नगर पंचायतचे गटनेते कौतिक पगार, धनंजय पवार आदींनी सत्कार केला.
याप्रसंगी मावळते उपसभापती हेमंत बोरसे, संचालक सुनील देवरे, हरिश्च॔ंद्र पगार, ॲड. मनोज शिंदे, सुनील महाजन, रामचंद्र गायकवाड, विष्णू बोरसे, बाळासाहेब वराडे, रमेश पवार, मधुकर जाधव, डी.एम. गायकवाड, ज्ञानदेव पवार, बाळासाहेब वराडे, वानूबाई पवार आदी संचालक उपस्थित होते.
निवडीप्रसंगी के.के. शिंदे, शंकरराव निकम, खंडेराव निकम, दादाजी निकम, सुनील पगार, देवा शिंदे, राजेंद्र पगार, छगन पगार, सुरेश निकम, अविनाश पगार, जयेश पगार, अतुल पगार, मनोज पगार, साहेबराव निकम आदींसह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
===Photopath===
280221\28nsk_28_28022021_13.jpg
===Caption===
कळवण बाजार समितीच्या उपसभापतीपदी शोभाताई निकम यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी सभापती धनंजय पवार ,शंकरराव निकम, खंडू निकम,हेमंत बोरसे सुनील देवरे ,साहेबराव निकम, रमेश पवार व संचालक मंडळ.